हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची नुकतीच माहिती समोर आली आहे. गौतमी पाटीलसह आणखीन चार जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश उत्सवानिमित्त अहमदनगरमध्ये वाहतूक रस्त्यावरच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळेच गौतमी पाटील, तिचा मॅनेजर आणि मंडळाच्या पदधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या जून महिन्यापासून गौतमी पाटीलचे कार्यक्रम बंद पडले होते. मात्र दहीहंडीनंतर पुन्हा गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. गणेश उत्सवाच्या निमित्ताने अहमदनगरमध्ये देखील एका गणेश मंडळाकडून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य म्हणजे, हा कार्यक्रम वाहतूक रस्त्यावरच ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या कारणामुळेच अहमदनगर पोलिसांनी गौतमी पाटील, मॅनेजर आणि मंडळाच्या पदधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, राज्यात चर्चेचा भाग बनलेली गौतमी पाटील हिच्यावर यापूर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर, विरारमध्येही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा वाद झाला होता. अशा घटनांमुळेच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी देण्यात येत नाहीये. कोणत्याही परवानगी विना अहमदनगरमध्ये ही गौतमी पाटील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.