मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं कंगनाला पडलं महागात! बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

0
53
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सतत वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणौत चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता कंगना विरोधात विक्रोळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बॉलीवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य करून बदनामी केल्याप्रकरणी कंगना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाच्या बेकायदा बांधकामावर केलेल्या कारवाई प्रकरणी कोणत्याही प्रकारे थेट संबंध नसतानाही उद्धव ठाकरेंवर आरोप करत बदनामी केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. कंगनाने ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत.

कंगनाने एक व्हिडिओ ट्विट करत ‘आज माझं घरं तुटलंय, उद्या तुमचा अंहकार तुटेल.’ असं वक्तव्य केलं आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यामुळे कंगना आक्रमक झाली आहे. कंगनाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं. याप्रकरणी विक्रोळी कोर्टातही अब्रुनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तक्रारदार अँडव्होकेट नितीन माने यांच्या तक्रारीनंतर विक्रोळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here