Saturday, February 4, 2023

शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 420 अन्वये दापोली पोलिसांनी या गुन्ह्याचीं नोंद केली असल्याची माहिती ट्विटद्वारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

भाजप नेते कितीत सोमय्या यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी अनिल परब यांच्यावर ताखल केलेल्या गुन्ह्याची माहिती दिली आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम करण्यात आले आहे. हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

- Advertisement -

त्यानंतर सोमय्यांनी या रिसॉर्टचे पाडकाम करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानंतर अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

दापोली येथील पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अॅड. अनिल परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात भादंवि 34 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला.