सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील धामणी गावा नजीकच्या शिवारात सोमवारी सायंकाळी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. शिवारात जनावरे चारण्यास घेवून गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. तेथील एका ओढ्याच्या काठावर असलेल्या झुडपांमध्ये बिबट्याचा बछडा मृतावस्थेत पडलेला होता.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही.
दरम्याम गेल्या 6 महिन्यापासून राज्यातील अनेक जिह्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातील अनेक बिबटे पकडन्यात वनविभागाला यश आले आहे.मात्र तरीही अजून काही बिबटे मानवी वस्तीत संचार करताना दिसत आहे.
अस असताना बिबट्यांच्या मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसातच एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांनंतर आता पुन्हा बिबट्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. वनविभागाला माहिती देताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. मात्र बिबट्याच्या मृत्यूची माहिती अद्याप समोर आली नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.