औरंगाबाद – महानगरपालिकेच्या वतीने नागरी मित्र पथकातर्फे लस न घेतलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे मागील तीन दिवसांमध्ये या पथकाने शहरात 19 हजार नागरिकांची तपासणी केली त्यामध्ये 81 जणांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले.
त्यांना प्रत्येकी 500 रुपये दंड याप्रमाणे महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाने तब्बल 40 हजार 500 रुपये दंडाची रक्कम वसूल केली आहे. यामध्ये मकबरा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा सिद्धार्थ उद्यानातील स्थानिक पर्यटकांचेही प्रमाणपत्र तपासण्यात आले आहे.
याशिवाय कचरा जास्त आढळून आल्या बद्दल 14 जणांकडून 2200 रुपये, जूना मोंढा येथील वैभव लक्ष्मी ट्रान्सपोर्ट येथे प्रतिबंधित 270 किलो कॅरीबॅग आढळून आल्याने 25 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्या चार जणांकडूनही 11 हजार रुपये दंड मनपाच्या नागरी मित्र पथकाने वसूल केला आहे.