Sunday, April 2, 2023

मनपाच्या पथकाकडून एका दिवसात तब्बल 55 हजार रुपयांचा दंड वसूल

- Advertisement -

औरंगाबाद – कोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी आल्यामुळे शासनाने तसेच स्थानिक मनपा प्रशासनाने अनेक निर्बंध काढून घेतले आहेत. परंतु, स्थानिक मनपा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाययोजना म्हणून शहरात विना मास्क फिरणाऱ्या तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याची मोहीम सुरूच आहे.

मागील अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेच्या वतीने नागरी मित्र पथकाच्या माध्यमातून शहरातील मुख्य चौकात वर्दळीच्या रस्त्यांवर विना मास्क तसेच रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे सुरू आहे अशातच काल रविवारी या नियमांचा भंग करणाऱ्यांवर मनपाच्या नागरी मित्र पथकाने दंडात्मक कारवाई करत एका दिवसात तब्बल 55 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला.

- Advertisement -

मनपाच्या वतीने रोज हजारो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे परंतु वसूल केलेल्या दंडाच्या रकमेचे पुढे काय केल्या जाते, तसेच आजतागायत किती रुपये दंड वसूल झाला याची कुठलीही माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली नाही.