नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात महाशिवरात्री निमित्त अंघोळीसाठी गेलेल्या मुलीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. शिरोमणी हणमंत होनशेट्टे असे मृत मुलीचे नाव आहे. मृत मुलगी बेलदरा येथील रहिवासी आहे. ती आज आपल्या वडिलांसोबत महाशिवरात्रीनिमित्त बळेगाव येथील गोदावरी नदीत स्नानासाठी केली होती. मात्र नदीच्या काठावर पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुलगी पाण्यात पडली आणि तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महाशिवरात्री निमित्त गोदावरी नदीवर स्नान करण्यासाठी अनेक भाविक जमले होते. हि मुलगी बुडत असताना भाविकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिला त्यामध्ये अपयश आले.
महाशिवरात्रीनिमित्त वडिलांसोबत स्नानासाठी गेली होती मुलगी
महाशिवरात्रीनिमित्त गोदावरी नदीवर लांबवरून भाविक स्नान करण्यासाठी येत असतात. मृत मुलगीसुद्धा तिच्या वडिलांसोबत स्नान करण्यासाठी आली होती. यानंतर मृत मुलगी नदीत अंघोळीसाठी उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. यादरम्यान हि मुलगी बुडत असताना तेथे उपस्थित इतर भाविकांनी तिला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या आणि तिला बाहेर काढले. मात्र त्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता. यानंतर या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी बेलदरा या गावी आणण्यात आले.
बीडमध्ये नदीपात्रात बुडून चार मुलांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी बीडमधील गेवराई तालुक्यातील शहजनापूर चकला या ठिकाणी पोहण्यासाठी नदीत गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. आकाश सोनवणे, गणेश इनकर, बबलू वक्ते, अमोल कोळेकर अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या मुलांना पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.