Google मध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

google
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  ज्या तरुणांना गुगलमध्ये इंटर्नशिप करण्याची इच्छा आहे अशा तरुणांकडून गुगल हिवाळी इंटर्नशिपसाठी अर्ज मागवून घेत आहे. हिवाळी इंटर्नशिपच्या माध्यमातून गुगल तरुणांना आपल्यासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. गुगलमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना दरमाही 80 हजार रुपये मोबदला दिला जाणार आहे. खास करून, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी चालून आली आहे. ज्या तरुणांना गुगलमध्ये इंटरशिप करायची आहे असे तरूण 1 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. त्यामुळे इच्छुक तरुणांनी आजपासूनच अर्ज करण्यास सुरुवात करावी.

कोण अर्ज करू शकेल?

गुगल कॉम्प्युटर क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना आपल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याचे सुवर्णसंधी देत आहे. तसेच मास्टर किंवा डिग्री प्रोग्रामच्या अंतिम वर्षात शिकत असणारे विद्यार्थी देखील इंटर्नशीपसाठी अर्ज करू शकतात. या इंटर्नशिपमध्ये गुगल तुमची सॉफ्टवेअर इंटर्न पदासाठी नेमणूक करेल.

पात्रता काय असेल?

खास करून कम्प्युटर क्षेत्राशी संबंधित असलेले तरुण या इंटर्नशीपसाठी पात्र ठरू शकतात. अर्ज करणाऱ्या तरुणाकडे सी, सी ++, जावा, जावास्क्रिप्ट, पायथन यासारख्या बेसिक कोडींग लँग्वेज संबंधित ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच त्याला डेटा स्ट्रक्चर्स आणि एल्गॉर्थिज्म याबाबतही माहिती असायला हवी.

अर्ज करण्याची प्रक्रिया

1) सर्वात आधी अर्ज करण्यासाठी careers.google.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2) यानंतर तुम्हाला Internship Applicaiton पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

3) समोर एक पेज येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रिझ्युम, CV आणि इतर माहिती भरावी लागेल.

4) तुमची सर्व माहिती भरल्यानंतर Higher Education सेक्शनमध्ये जाऊन तिथे विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.

5) यानंतर Degree Status मध्ये Now Attending पर्याय निवडा. पुढे तुमचा वर्तमान अधिकृत किंवा अनधिकृत इंग्रजी ट्रांसक्रिप्ट अपलोड करा.

6) तसेच, त्यानंतर तुम्हाला सोयीस्कर हवे ते लोकेशन निवडा. यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करा. हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही जर इंटर्नशीप पात्रतेत बसला तर तुम्हाला गुगलकडून संपर्क केला जाईल.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख

दरम्यान, गूगलने कंपनीत इंटर्नशिप प्रोग्रॅम सुरू केला आहे. या प्रोग्राम अंतर्गत गुगल इंटर्नशिपसाठी तरुणांची भरती करत आहे. ही इंटर्नशिप जानेवारी 2024 पासून सुरु होईल. आता फक्त अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 1 ऑगस्टपर्यंत इच्छुक तरुण अर्ज दाखल करू शकतात. ज्या उमेदवारांची गुगल निवड करेल त्या उमेदवारांना हैदराबाद किंवा बंगळुरु येथील ऑफिसमध्ये जॉईनिंग केले जाईल.