एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांच भवितव्य आज ठरणार?; निर्णयाकडे राज्याचं लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, 16 आमदारांना अपात्र करा, असे पत्र शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आले होते. पण या नोटिशीला उत्तर न देता या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज दि. 11 जुलै रोजी निर्णय घेण्यात येईल असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार आज होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध न करता आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोरांच्या आमदारकीचे भवितव्य हे दिसणार आहे. तर दुसरीकडे शिंदे सरकारकडे सध्या 164 इतकं बहुमत असून त्यापैकी 16 आमदार जरी अपात्र ठरले तरी ही संख्या 148 इतकी होईल. विधानसभेतील बहुमत हे 144 इतके आहे.

अपात्रतेची टांगती तलवार असलेले हे 16 आमदार कोण?

एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे.

शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार?

शिवसेनेने ज्या 16 आमदारांवर कारवाई करा, असे पत्र दिले आहे त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचेही नाव आहे. जर इतर आमदारांसह एकनाथ शिंदे यांची आमदारकी अपात्र जरी ठरवली तरी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कोणताही धोका नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असणे किंवा आमदार असणे आवश्यक नाही. पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यामध्ये त्याने दोन्हीपैकी एका सभागृहात निवडून येणे गरजेचे आहे, असा नियम आहे.

Leave a Comment