हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. येथील कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची घटना घडली. कारखान्यात 40 कामगार असून 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाके बनविण्याची फॅक्टरी आहे. या ठिकाणी आज भीषण स्फोट झाल्याची घटना आज घडली आहे. येथील फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला.
फटाके फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली असून स्थानिकांच्या माहितीनुसार 6 ते 7 कर्मचारी जखमी झाले आहेत. तर दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते.
सोलापूर ग्रामीण पेालिस दलाचे वरिष्ठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बार्शी, कुर्डूवाडी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, टेंभुर्णी आदी भागातील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझविण्याचे काम करीत आहेत.
मृतांची संख्या वाढण्याची भीती
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाके बनविण्याची फॅक्टरीला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सध्या दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असला तरी मृतांची संख्या वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.