हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बिहारमध्ये ‘ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी’ अशा खोट्या ऑनलाईन वेबसाईटवरून फसवणूक करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आठ आरोपी ज्या महिलांना मूल होत नाही त्यांना प्रेग्नेंट करा आणि लाखो रुपये मिळवा असे सांगून व्यक्तींकडून ऑनलाईन नोंदणीसाठी लाखो रुपये घेत होते. अखेर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
बिहारमध्ये एकूण आठ जणांची टोळी ‘ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी’ अशा बनावट वेबसाईटवरून सामान्य लोकांशी संपर्क साधत होती. तसेच जे व्यक्ती त्यांच्या जाळ्यात अडकले त्यांना, तुम्ही ज्या महिलांना मूल होत नाही त्यांना प्रेग्नेंट करा, आणि लाखो रुपये कमवा असे सांगत होते. इतकेच न करता ही टोळी ऑनलाइन नोंदणीच्या नावाखाली जाळ्यात अडकलेल्या व्यक्तींकडून लाखो रुपये उकळून घेत होती. आजवर या टोळीने अनेक व्यक्तींकडून पाच ते वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतली होती.
परंतु पोलिसांना याबाबतची माहिती मिळतात त्यांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला. बिहार पोलिसांनी एकाच ठिकाणाहून या आठ जणांना आपल्या ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून अनेक मोबाईल आणि एक प्रिंटर जप्त केला. या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी एक विशेष टीम नेमली होती. या टीमनेच सर्व प्रकरणाचा तपास करत 8 आरोपींना ताब्यात घेतले. ही 8 जणांची टोळी नोकरी शोधत असणाऱ्या किंवा पैशांची गरज असणाऱ्या व्यक्तींना सांगत असे की, तुम्ही ज्या महिलांना बाळ होत नाही, त्यांना प्रेग्नेंट करा आम्ही तुम्हाला लाखो रुपये देऊ. असे सांगूनच या टोळीने अनेक व्यक्तींकडून पैसे घेतले होते.