विजेच्या तुटवड्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; ‘या’ राज्याकडून घेणार वीज विकत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यावर सध्या कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज टंचाई व निर्मितीचे संकट आहे. या अनुषंगाने आज पार पडलेल्या राज्यमंत्री मंडळाच्या विशेष बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये राज्यावरील लोडशेडिंग टाळण्यासाठी आधीच्या करारापेक्षा वाढीव दराने वीज खरेदी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून ती वीज गुजरात या राज्याकडून खरेदी करण्यात येणार आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत. मंत्री छगन भुजबळहि उपस्थित होते. यावेळी बैठकीत वीजबिल दरवाढ संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. कोळशाच्या तुटवड्यामुळे अतिरिक्त वीज घ्यावी लागणार असल्याने तसेच राज्याच लोडशेडींग होवू नये. या विषयाच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.

लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्यांना वाढीव वीज बिलाचा चांगलाच शॉक बसला. त्यामुळे वीज वितरण विरोधात राज्यभरात संतापाची लाटही पहायला मिळाली. दरम्यान वाढीव वीजबिल व आगामी काळात कोळशाच्या तुटवड्यामुळे निर्माण होणाऱ्या वीज टंचाईसंदर्भात आज महाराष्ट्र कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गुजरात राज्याकडून वीज खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अशी आहे राज्यातील विजेची स्थिती?

महाराष्ट्र राज्यात सर्वसाधारणपणे एकून वीज वापराच्या ८७ टक्के वीज महावितरणकडून वितरीत होते. मार्च २०२२ पासून कृषी ग्राहकांकडूनही विजेचा वापर वाढला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळेही राज्याची उच्चतम मागणी २८ हजार ४८९ मेगावॅटपर्यंत पोहचली आहे. ही मागणी मागच्या वर्षाच्या तुलनेत ८.२ टक्क्यांनी वाढली आहे. सध्या साडेतीन हजार ते चार हजार मेगावॅटचा तुटवडा भासत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी १ हजार ९०० मेगावॅटचा कोयना जल विद्युत प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवण्यात येत आहे. प

Leave a Comment