Wednesday, October 5, 2022

Buy now

धक्कादायक ! पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीतील पांजरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पतीच्या जाचाला कंटाळून एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आपल्या आयुष्य संपवले आहे. दुर्गा मुकेश टांगले असे या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतुन बाहेर काढला आहे. यानंतर पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नीची आत्महत्या
मृत महिला तुमसर तालुक्यातील पांजरा येथील रहिवासी आहे. तिच्या पतीला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन जडले होते. दारुच्या नशेत दररोज दुर्गाचा पती तिला मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी मृत दुर्गा कामाला जात आहे असे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती सायंकाळपर्यंत घरी परतलीच नाही. यामुळे घरच्यांनी तिला सगळीकडे शोधले मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही.

यानंतर दोन दिवसांनंतर पांजरा येथील मेश्राम नावाच्या व्यक्तीच्या विहिरीमध्ये तिचा मृतदेह तरंगत असताना गावकर्‍यांनी पाहिला. या घटनेची माहिती गावभर पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतुन बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.