अल्पवयीन मुलीवर 13 नराधमांनी केला 26 वेळा बलात्कार; आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना

Rape case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणा मध्ये मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. पिडीत मुलगी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. याचवेळी प्रियकरासोबत मिळून एकूण 13 जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आता याप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल करत 11 जणांना ताब्यात घेतले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना 17 ते 19 डिसेंबर दरम्यान घडली आहे. आपली मुलगी बेपत्ता झाल्यामुळे संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मुलीचा तपास करीत असतानाच ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सध्या 17 वर्षीय मुलीची प्रकृती प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

13 जणांनी 26 वेळा बलात्कार केला

17 वर्षीय पिडीत मुलगी आपल्या प्रियकरायला भेटण्यासाठी गेली होती. याचवेळी तिच्या प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून मुलीवर बलात्कार केला. यानंतर एका व्यक्तीने मदतीचा हात पुढे करत तिला विश्वासात घेतले. परंतु त्याने देखील या मुलीचा फायदा घेत आपल्या साथीदारांसोबत मिळून तिच्यावर बलात्कार केला. या मुलीवर दोन दिवसात 13 जणांनी 26 वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

याप्रकरणी आरोपी असलेल्या अकरा जणांना झारखंडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच इतर दोघांचा शोध सुरू आहे. सध्या या सर्व घटनेमुळे पिडीत मुलगी शॉकमध्ये गेली आहे. तिची प्रकृती बरी होण्यास बराच वेळ लागेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर पिडीतेने दिलेल्या जबाबदाच्या आधारे 31 डिसेंबर रोजी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.