ती खोटं बोलतेय.. त्याचं बाहेर अफेअर आहे.. ‘काय घडलं त्या रात्री’..?; करण मेहरा आणि निशा रावलच्या केसचे नवे वळण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहरा आणि त्याची पत्नी अभिनेत्री निशा रावल यांच्यात सोमवारच्या रात्री भलामोठा वाद झाला. त्यानंतर या घरगुती भांडणाचे हिंसाचारात रूपांतर झाल्याने हे प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहचले. निशाने करणवर थेट मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासाठी निशाने पत्रकार परिषदही घेतली. यात तिने सांगितले की, करणचे विवाहित असूनही बाहेर अफेअर आहे. अनेक दिवसांपासून करण माझा विश्वासघात करत होता. काही महिन्यांपूर्वीच हे सत्य उघडकीस आले. मी करणच्या मोबाईलमध्ये मेसेज पाहिले. त्या दोघांना एकत्रही बघितले आहे. पण नवऱ्याची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून मी कधी बाहेर सांगितले नाही. परंतु आता हा वाद आता घटस्फोटापर्यंत पोहचला आहे. करणने माझ्यासोबत नातं ठेवण्यासही नकार दिला असल्याचे निशाने सांगितले.

https://www.instagram.com/tv/CPlMY4uDMqy/?utm_source=ig_web_copy_link

इतकेच नव्हे तर, मी घटस्फोट घेण्यासाठी तयार होते. हे नातं टिकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, परंतु करणचे माझ्यासोबतचे वागणे अचानक पूर्णतः बदलले होते. या उपर जाऊन करणने माझ्या लग्नातील सोन देखील विकून टाकले. मुलाच्या जबाबदारीपासून करण नेहमीच पळ काढत होता. मात्र हे सहन होत नसल्याने मी करणशी बोलण्यासाठी गेले. तेव्हा करणने मला बेदम मारहाण केली. या मारहाणीचे काही फोटो निशाने या पत्रकार परिषदेत दाखवले.

https://www.instagram.com/p/CNH26QsJC8G/?utm_source=ig_web_copy_link

 

सोमवारी रात्री वादादरम्यान नेमकं काय घडलं तेही तिने पत्रकार परिषदेत सांगितले. आमच्या नात्याच्या भविष्यासाठी मी करणशी बोलायला त्याच्या घरी गेले तेव्हा आम्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दरम्यान करण मध्येच निघून गेला. मला वाटले कि तो त्याच्या रुममध्ये गेला आहे. पण तो परत आला आणि माझं डोकं पकडून त्याने भिंतीवर आपटले. माझ्या डोक्यातून रक्त यायला लागले मात्र तरीही करण थांबला नाही. त्याने माझा गळासुद्धा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरात इतर लोकंही उपस्थित होते, असे निशाने तक्रारीत म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CPlXypFrzk2/?utm_source=ig_web_copy_link

तर निशाच्या या वक्तव्यानंतर करणनेही आपली बाजू मांडून या केसाला अनोखे वळण दिले आहे. निशा आणि तिच्या भावाने घटस्फोटासाठी जी रक्कम मागितली तेवढी रक्कम देणे माझ्यासाठी शक्य नव्हते. इतके पैसे मला देता येणार नाही ह्या गोष्टीवरून आमच्यात वाद सुरू होता.

https://www.instagram.com/p/CPlPBvRrWpf/?utm_source=ig_web_copy_link

रात्री १० वाजता ते दोघेही माझ्याजवळ आले. तेव्हाही ते याच विषयावर माझ्याशी बोलत होते. तेव्हा मी स्पष्टपणे सांगितले कि, इतकी रक्कम मी तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्हाला जे काही कायदेशीर करायच आहे ते करा. मग मी देखील कायद्यानेच उत्तर देतो. यानंतर मी माझ्या रुममध्ये गेलो, माझ्या आईशी बोलत होतो. तेव्हा निशा आतमध्ये आली तिने माझ्या आई-वडिलांना, भावाला शिवीगाळ करायला सुरुवात केली.

https://www.instagram.com/p/CPkplocDtP6/?utm_source=ig_web_copy_link

पुढे, जोरजोरात ओरडायला लागली आणि माझ्या अंगावर थुंकलीसुद्धा. तेव्हा मी निशाला बाहेर जायला सांगितले. त्यानंतर आता बघ मी काय करते, अशी धमकी देऊन ती बाहेर गेली. सुरुवातीला निशाने स्वत:च डोकं भिंतीवर आपटून घेतले. सर्वांना हे सांगितले कि मला करणने मारहाण केलीय. निशाच्या भावानेही मला मारहाण केली. माझ्या गालावर आणि छातीवर मारहाण केली. पण मी तिला मारहाण केली नाही. ती खोटं बोलतेय. हवंतर घरातील कॅमेरे पाहू शकता पण कॅमेरे आधीच बंद केले असल्याचे आढळले आहेत, असे करणने सांगितले.

Leave a Comment