हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना महामारीच्या सावटातून जग आता कुठे स्थिर होत असताना आणखीन एक धोक्याची बातमी इंडोनेशियामधून समोर आली आहे. सध्या कोरोना विषाणू जरी आटोक्यात आला असला तरी देखील इतर विषाणूंचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच इंडोनेशियामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. या बातमीनंतर संपूर्ण जगाच्या चिंतेत आणखीन वाढ झाली आहे.
समोर आल्यामुळे माहितीनूसार, जकार्तामधील एका रुग्णाच्या स्वॅबमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा एक उत्परिवर्तित प्रकार आढळून आला आहे. ज्याचे किमान ११३ वेळा उत्परिवर्तन झाले आहे. मुख्य म्हणजे, हा विषाणू ओमिक्रॉनेक्षा ही पेक्षा जास्त भयानक असल्याचा दावा तज्ञांकडून करण्यात आला आहे. त्यांच्यानुसार, हा विषाणू आतापर्यंत नोंदलेल्या व्हेरिएंटपैकी सर्वात उत्परिवर्तित व्हेरिएंटपैकी एक असू शकतो.
त्याचबरोबर, या नवीन विषाणूचे संक्रमण पाहता जगाला लॉकडाऊनची गरज भासणार नाही अशी माहिती देखील तज्ञांकडून देण्यात आली आहे. तसेच, या नविन विषाणूचे क्रॉनिक इन्फेक्शन सामान्यत: रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये आढळून आले आहेत. यामध्ये एड्सचे रुग्ण, कर्करोगासाठी केमोथेरपी उपचार घेणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे, या विषाणूचा दुसऱ्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका फार कमी आहे. परंतु हा नवीन विषाणू शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीला चकमा देण्यास सक्षम ठरू शकतो. या विषाणूमध्ये सतत बदल होत असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. जर एखाद्या व्यक्तीला पूर्वीचा कोणता आजार असेल तर त्या व्यक्तीत हा विषाणू लगेच शिरकाव करू शकतो अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.
दरम्यान इंडोनेशियामध्ये सापडलेल्या या नवीन विषाणूबाबत तज्ञांना जास्त माहिती हाती लागलेले नाही. तसेच हा विषाणू ज्या रुग्णाच्या नमुन्यातून सापडला आहे त्याचीही माहिती उघडकीस करण्यात आलेली नाही. मात्र एका नवीन विषाणूमुळे इंडोनेशियामध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच इतर करावे असे आवाहन तेथील प्रशासनाने केले आहे.