सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
आम्हाला मिळाले 50 खोके. पण तुमच्या पोटात का दुखतंय, असा प्रतिसवाल शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे. कोरेगाव (Koregaon) तालुक्यातील सातारारोड येथे झालेल्या शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात आ. महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) बोलत होते. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली.
शिवसेनेतून (Shiv sena) बंडखोरी करत बाहेर पडण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना 50 खोके मिळाल्याचा आरोप वारंवार केला जातो. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर 50 खोके एकदम ओके… ही घोषणा महाराष्ट्राच्या गावा-गावात पोहोचवली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते संधी मिळेल तेथे या आरोपांचं खंडण करतात. सातारारोड येथेही त्यांनी या आरोपाचे खंडण केले.
शिंदे गटाचे आ. महेश शिंदे म्हणाले… आम्हाला मिळाले 50 खोके पण… pic.twitter.com/rJjWL2eLbU
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) December 24, 2022
पन्नास खोके एकदम ओके या होत असलेल्या टीकेवर उत्तर देत विरोधकांना तुमच्या पोटात का दुखतय असा प्रतिसवाल केला..आमच्यावर पन्नास कोटी काय… हजार कोटी काय… या कोरेगाव मतदार संघाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निधी देतील असा टोला विरोधकांना लगावला. खोके म्हणलं की सर्वांच्या मनात पापच येणार. तुमच्या नेत्यांना लवासातून खोके मिळतात. कोरेगावच्या जरंडेश्वर कारखान्यातून खोके मिळतात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे खोके विरोधकांना माहीत आहेत, त्यामुळे खोक्याच्या घोषणा तर ते देणारच म्हणूनच जनतेने आम्हाला एवढा विजय दिला असल्याचा खोचक टोला आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.