कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
ग्रामीण भागात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज मसूर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आठ दिवस दवाखाने व मेडिकल वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मसूर गावात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
मसूर मधील सर्व किराणामाल, भाजीपाला, बेकरी वाले, दुग्धजन्य पदार्थ,. मटन चिकन दुकान या सर्व व्यापाऱ्यांची मीटिंग बोलवण्यात आली होती. या मिटिंगमध्ये मसूर गावातील कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी सर्वानुमते गावातील सर्व अत्यावश्यक सेवेतील (दवाखाने व मेडिकल वगळता) पूर्णपणे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. रविवार दिनांक 02मे पासून रविवार 09 मे पर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत मसूर मध्ये एक आठवड्याचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. तरी सर्वांनी नियमाचे पालन करावे. जो कोणी नियमाचे उल्लंघन करेल त्याच्यावर पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करेल. तरी सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या गावाला व आपल्या मसूर परिसरातील गावांना कोरोना सारख्या महामारी पासून वाचवण्यासाठी प्रशासनाला मदत करावी असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ क्रीडा समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले.
यावेळी मसूरचे पोलीस अधिकारी प्रवीण जाधव, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, प्रमोद चव्हाण, सुनील जगदाळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे मसूर शहराध्यक्ष सिकंदर शेख, बाळकृष्ण गुरव, जगन्नाथ कुंभार, समीर मुल्ला यांच्यासह मसूर मधील सर्व व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.