मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणारी मित्रांची जोडी गजाआड; 5 महागड्या गाड्या पोलिसांकडून जप्त

औरंगाबाद – मौजमजा करण्यासाठी निर्जनस्थळी उभी केलेली दुकाची चोरी करणाऱ्या दोन मित्रांच्या बेगमपुरा पोलिसांनि मुसक्या आवळल्या त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या पाच महागड्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मोहम्मद हुसेन मोहम्मद गौस, आरिफ सय्यद अहेमद सय्यद अशी पोलिसांनी अटक केलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बेगमपुरा पोलीस ठाणे हद्दीतील घाटी रुग्णालय, व इतर ठिकानातील दुचाकी चोरी बाबत ठाण्याचे पथक माहिती घेत असताना हुसेन व आरिफ दोघेही दुचाकी चोरी करीत असल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली होती.

या माहितीवरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.या जोडी कडून शहरातील वाहनचोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.