चक्क एका व्यक्तीने संस्कृतमध्ये केले क्रिकेट सामन्याचे अफलातून समालोचन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल क्रिकेट सगळ्यांना आवडते. समालोचन (Commentary) हा क्रिकेट सामन्याचा अविभाज्य भाग आहे. या समालोचनामुळे (Commentary) आपल्याला क्रिकेट पाहण्याचा आंनद अधिक वाढतो. बोलतात ना मिठाशिवाय जेवणाला चव नाही तसेच समालोचनाशिवाय (Commentary) क्रिकेटला मज्जा नाही. आपण आतपर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन (Commentary) हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये ऐकले आहे. गल्लीतील क्रिकेटमध्येदेखील आपापल्या प्रादेशिक भाषेत समालोचन केले जाते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका समालोचन करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा तरुण हिंदी, इंग्रजी भाषेत समालोचन न करता थेट संस्कृत भाषेत समालोचन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये काही मुले क्रिकेट खेळताना दिसत आहे. यात एक व्यक्ती संस्कृत भाषेतून क्रिकेट सामन्याची माहिती (Commentary) देत आहे. तसेच, क्रिकेट सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांशी तो अस्खलितपणे संस्कृतमध्ये संवाद साधताना दिसत आहे. कॉमेंट्री करताना अचानक फलंदाज एक मोठा शॉट मारतो. याचे वर्णन ही व्यक्ती इतक्या वेगाने संस्कृत भाषेत करते की तो त्या भाषेत कितीं निपुण आहे याचा प्रत्यय येतो.

हे अनोखे समालोचन (Commentary) पाहून अनेक लोकांनी या व्यक्तीचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून एकाने संस्कृत बोलता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…