सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
लव्ह जिहाद, धर्मातरण आणि गोहत्या विरोधी कायदा महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी सातारा येथे आज हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात हजारोंच्या संख्येने तरुण, विविध संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हिंदू धर्म रक्षणासाठी साताऱ्यात रविवारी राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश सचिवपदी विक्रम पावसकर, भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लव्ह जिहाद, धर्मांतर गोहत्या विरोधात साताऱ्यात जन आक्रोश मोर्चा pic.twitter.com/jHVvQZW2IE
— santosh gurav (@santosh29590931) December 4, 2022
यावेळी जय श्रीराम असा जयघोष करत ऐतिहासिक राजवाडा परिसरात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत भव्य रॅलीला सुरुवात केली. यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख चौकातून जात महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत रॅली काढण्यात आली. लव्ह जिहाद, धर्मांतरण, श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबला लवकर फाशी देण्यात यावी, गोहत्या विरोधी कायदा राज्यासह देशात लागू करावा आदी मागण्या जनआक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आल्या.