एका अफवेमुळे गुंतवणुकदारांचे बुडाले कोट्यवधी रुपये; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एखाद्या अफवेमुळे गुंतवणुकदारांनी कष्टाने कमावलेला पैसा डोळ्यांसमोर क्षणात कसा नष्ट होतो. याचे मोठे उदाहरण सोमवारी भारतीय शेअर बाजारातील घसरणीत पाहायला मिळाले. बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, LTCG टॅक्स बाबतची अफवा गुंतवणूकदारांमध्ये पसरली आणि विक्रीत घबराट पसरली.

केडिया एडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की,”लॉन्ग टर्म कॅपिटल गेन (LTCG) टॅक्स बाबत बाजारात अफवा पसरली होती की सरकार येत्या अर्थसंकल्पात मोठे बदल करू शकते. याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या कमाईवर आणि कर दायित्वावर होईल. या गोष्टीने देशांतर्गत गुंतवणूकदारांसह परदेशी गुंतवणूकदारांनाही धक्का बसला आणि त्यांनी भारतीय भांडवली बाजारातून आपले पैसे काढण्यास सुरुवात केली. परकीय गुंतवणूक पोर्टफोलिओ (FPI) मध्ये घट झाल्यामुळे बाजारभावावर परिणाम झाला, ज्याचा परिणाम मोठ्या घसरणीच्या रूपात दिसून आला.”

याबाबत अफवा पसरली होती
सरकार बजेटमध्ये LTCG मध्ये सुधारणा करून टॅक्सचा दर सध्याच्या 10 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते, असे बेअर्सच्या वतीने सांगण्यात आले. यासोबतच त्याचा कालावधी 1 वर्षावरून 3 वर्षांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे. यामुळे बाजारात भीती पसरली आहे. विदेशी गुंतवणूकदारही काहीही विचार न करता उलटे धावू लागले आणि बघता बघता जवळपास 9 लाख कोटी रुपये बाजारात बुडाले.

येथे गुंतवणूकदार टॅक्स हटवण्याची मागणी करत आहेत
शेअर बाजारातील गुंतवणूकदार सरकारकडे बजेटमध्ये LTCG टॅक्स रद्द करण्याची मागणी करत आहेत. गुंतवणूकदार आधीच सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन (STT) भरत असताना LTCG टॅक्स लावण्याबाबत काय तर्क आहे? असे ते म्हणतात. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”भारतात ट्रेडिंग टॅक्स खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत LTCG चा बाजारातील भावावर विपरीत परिणाम होतो.”

गुंतवणूकदारांना दुहेरी फटका
गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन म्हणतात की STT पूर्णपणे काढून टाकला पाहिजे किंवा तो थोडासा कमी केला पाहिजे. सुरुवातीला हे LTCG ऐवजी लागू करण्यात आले होते परंतु आता LTCG आणि STT दोन्ही लागू आहेत. यामुळे गुंतवणूकदारांवर दुहेरी बोजा पडतो, जो भारतीय भांडवली बाजाराच्या दृष्टीकोनातून योग्य नाही.

Leave a Comment