संजय राऊत म्हणजे खुशामतगीर; भाजप आमदाराचे टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील राजकारणात दिवसेंदिवस भाजप आणि शिवसेनेतील वैर वाढत चालले असून भाजप आमदार राम सातपुते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचे इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं अशी टीका त्यांनी केली आहे.

जनाब संजय राऊत,तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं,त्यामुळे आपल्याला ‘प्राईड व्ह्युल्यु ‘काय असते ? हे समजण्याची तुमची कुवत नाही..
महाराष्ट्रातील बार्टी संस्थेचं वाटोळं तुमच्या सरकारने केलंय त्यावर पण बोला कधी तरी असे ट्विट राम सातपुते यांनी केलं आहे.

प्राईड व्ह्युल्यु ‘काय असते ? हे समजण्याची संजय राऊत यांची कुवत नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी बांधत असलेलं सेंट्रल व्हीस्टा हे नव संसद भवन असो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असो की काशीचं भव्य दिव्य मंदीर असो. हे सर्व तुमचा जळफळाट करणारच आहे.’ अस सातपुते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा टक्का उच्चशिक्षण व संशोधनात वाढावा या साठी बार्टीसारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु या आघाडी सरकारच्या कामचुकार धोरणामुळे तिचा उद्देशच नष्ट होतोय. यामुळे ५१८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती होऊन वर्ष उलटून गेलं तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेल्या नाहीत. यावर आपण कधी बोलणार की, वंचीत नेहमी वंचीतच राहिले पाहिजे, हे काँग्रेसचच धोरण आपण राबवणार आहात असा सवालही सातपुते यांनी राऊतांना विचारला आहे