जन्मदातीच ठरली वैरी! नाकाला चिमटा लावून आईनेच केली पोटच्या गोळ्याची हत्या

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अकोला शहरातील बलोदे लेआऊटमध्ये एका आईनेच आपल्या 5 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण घडकीस आले आहे. किशोरी रवी आमले असे या 5 वर्षीय मुलीचे नाव असून विजया आमले असे मारेकरी आईचे नाव आहे. सुरुवातीला मारेकरी आईने नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव केला होता. मात्र वैद्यकीय अहवालात या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी आईवर गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली आहे. परंतु आईनेच मुलीचा काटा काढल्यामुळे या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे.

नेमक प्रकरण काय?

सर्वात प्रथम मारेकरी आईने आपली मुलगी नाकाला चिमटा लावून झोपली असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सर्वांना सांगितले होते. परंतु मुलीच्या वडिलांचा पत्नीवर संशय असल्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली. ज्यामध्ये आढळून आले की मुलीची हत्या करण्यात आली आहे. तसेच मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या काही खुणा आढळणाऱ्यामुळे हे स्पष्ट झाले की तिचा खूनच झाला आहे. यानंतर खदान पोलिसांनी मारेकरी आईचा विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच तिला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होते. तिने घटस्फोट देखील मागितला होता. परंतु घटस्फोट न दिल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

नाकाला चिमटा लावून हत्या

गेल्या 2 जून रोजी मुलीचे वडील सकाळच्या वेळेतच कामाला गेले होते. तर मुलगी देखील ट्युशनला गेली होती. थोड्या वेळानंतर दुपारी वडील जेवायला आल्यानंतर त्यांनी मुलीसोबत जेवण केले, तसेच धिंगाणा मस्ती केली आणि त्यानंतर पुन्हा कामाला निघून गेले. परंतु दुपारी पत्नीचा त्यांना फोन आला की, किशोरी बराच वेळ झोपेतून उठत नाहीये. मी उठवण्याचा प्रयत्न केला तरी ती उठत नाहीये. तुम्ही घरी या. यानंतर मुलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले परंतु त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

यानंतर जेव्हा, किशोरीच्या आईला या घटनेविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, किशोरी बराच वेळ कपडे सुकायला टाकण्याकरिता आणलेल्या चिमट्याशी खेळत होती. सर्व कामे उरकल्यानंतर मी जेव्हा किशोरीला पाहिला गेले त्यावेळी तिच्या नाकाला हा चिमटा लागलेला होता. मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठली नाही. हा सर्व प्रकार ज्या वेळेत घडला त्यावेळी घरी फक्त किशोरी आणि तिची आईच होती. त्यामुळे पोलिसांचा संशय आईवरच आहे. तर पती रवीने दिलेल्या माहितीमुळे किशोरीच्या आईनेच तिची हत्या केल्याचे म्हटले जात आहे.