पुणे हादरलं! मंगला थिएटरबाहेर तलवार, चाकूने वार करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. नुकतीच, पुण्यातील मंगला थिएटर बाहेर एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये, पिक्चर संपल्यावर थेटरमधून बाहेर पडताच तरुणावर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ला करण्यात आला. यानंतर दहा-बारा जणांनी एकत्र येऊन या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी शिवाजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री एकच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात खळबळ माजली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी नितीन मस्के मंगला थेटरमध्ये पिक्चर पाहण्यासाठी गेला होता. रात्री एकच्या सुमारास पिक्चर संपल्यानंतर तो थिएटरमधून बाहेर पडला. त्याचवेळी दहा-बारा जणांनी येऊन नितीन म्हस्केला घेरले. हे सर्वजण येताना तलवार, चाकू लोखंडी रॉड घेऊन आले होते. यानंतर या सर्वांनी मिळून नितीन म्हस्केवर चाकू, तलवारीने वार केले. यामध्येच नितीन मस्के या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नितीन म्हस्के याचा काही तरुणांशी वैयक्तिक वाद होता. ह्या वादामुळेच त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आता नितीनच्या खुणानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या सर्व घटनेचा तपास करीत आहेत. मुख्य म्हणजे, शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी १० ते १२ संशयतांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, नितीन म्हस्केसोबत घडलेल्या सर्व घटनेची माहिती त्याच्यासोबत आलेल्या मित्राने पोलिसांना दिलेली आहे. संबंधित तक्रारदार नितीन मस्केसोबत गदर 2 पिक्चर पाहण्यासाठी मंगला थेटरमध्ये आला होता. त्यापूर्वीच या दहा-बारा जणांची टोळी नितीन मस्केची वाट बघत थेटर बाहेर थांबली होती. पिक्चर सुटल्यानंतर नितीन बाहेर येतात या टोळीने त्याला घेतले. तसेच यांच्यामध्ये बातचीत देखील सुरू झाली. परंतु सुरू झालेल्या वादातच या टोळीने नितीनवर वार करण्यास सुरुवात केली. यानंतर सर्वजण तेथून फरार झाले.