हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात खळबळ होणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आज संसदेचे कामकाज सुरू असताना एक तरुण अचानक आतमध्ये शिरला. यामुळे संसदेत गोंधळ उडाला. यानंतर संसद अध्यक्षांनी देखील कामकाजाला तातडीनं स्थगिती दिली. तसेच, या तरुणांना ताब्यात घेण्यात यावे, असे आदेश देण्यात आले. मात्र या सर्व घटनेमुळे संसदेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
#WATCH लोकसभा की विजिटर गैलरी से एक अज्ञात व्यक्ति कूद गया जिसके बाद सदन में हंगामा हुआ और सदन को स्थगित कर दिया गया। pic.twitter.com/70ZCasi3nC
— ANI_HindiNews (@AHindinews) December 13, 2023
समोर आलेल्या माहितीनुसार, आज संसदेचे कामकाज सुरू असताना एक तरुण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरला. यानंतर त्या तरुणाने संसदेत घोषणाबाजी देखील केली. या तरुणाने केलेल्या कृत्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. तसेच, सुरक्षा रक्षकांचीही तारांबळ उडाली. यानंतर, या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. मात्र या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या पोलीस हा तरुण कोण आहे? तो अचानक आत कसा शिरला? याचा तपास करीत आहेत.