कोरोनाचा उद्रेक! मागील २४ तासांत देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे कोरोनाबाधित आढळले

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग अजूनही नियंत्रणात आणण्यास सरकारला यश आलेलं नाही आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहचली आहे.

देशभरातील ४३ लाख ७० हजार १२९ करोनाबाधितांमध्ये ८ लाख ९७ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ३३ लाख ९८ हजार ८४५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ७३ हजार ८९० जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. देशभरात ८ सप्टेंबरपर्यंत ५,१८,०४,६७७ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील ११ लाख ५४ हजार ५४९ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like