खेळातुन एखादा राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू निर्माण व्हावा- रामकृष्ण वेताळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलासुप्त गुणांना वाव मिळाला, खेळातून एकदा राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण व्हावा. खेळामुळे आपले मन ,शरीर कणखर व दणकट बनते. साहस, जिद्द, चिकाटी,सराव आणि सातत्य असले की खेळात यश मिळते असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले. यशवंत शिक्षण संस्थेचे सुर्ली माध्यमिक विद्यालयत आयोजित संस्था अंतर्गत क्रीडा स्पर्धा चे उद्घाटन वेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव डी. ए.पाटील, सरपंच दत्तात्रय वेताळ,प्रा.सचिन जाधव, सुजाता जाधव.मुख्याध्यापक ए.आर.मोरे,डी.पी.पवार,व्ही.एच.कदम,जी.बी देशमाने,के.आर.साठे व सर्व शाखांचे क्रिडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

रामकृष्ण वेताळ म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यासाठी स्वर्गीय ए.व्ही.पाटील यांनी ग्रामीण भागात शाळा सुरू केली. यामुळे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले. क्रिडा स्पर्धेत जय पराजय होतो, यामध्ये खेळाडूनी खिळाडूवृत्तीने खेळावे.

यावेळी संस्था सचिव डी.ए.पाटील म्हणाले की, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी संस्था शाळा स्तरावर विविध सहशालेय उपक्रम राबविते. खेळाने आपले अंगी चपळपणा येतो. खेळामुळे मन, मेंदू,मनगट,शरीर दणकट व निरोगी राहते. जिद्द, चिकाटी व मेहनत घेतली की खेळात यश मिळते. शासकीय क्रिडा स्पर्धेत ही संस्था मधील शाळांनी हॉलीबॉल स्पर्धेत, वैयक्तिक कुस्ती,जुदो, स्केटिंग मध्ये यश संपादन केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.जे.मुळीक, स्वागत मुख्याध्यापिका के.आर.साठे यांनी सुत्रसंचलन एन.पी.पाटील यांनी व आभार आर.टी.पाटील यांनी मानले.