व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

…. तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते; राज ठाकरे असं का म्हणाले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज ते मुख्यमंत्री झाले असते असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. पुण्यात ‘अशोक पर्व’ कार्यक्रमाचं आयोजन आलं आहे. यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा सत्कार राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शाब्दिक फटकेबाजी केली तसेच अशोक सराफ यांचे कौतुक केलं.

कलावंतांचे आपल्या देशावर खूप उपकार आहेत. कलाकार नसते तर देशात कधीच अराजकता आली असती. आपला देश चुकीच्या दिशेला गेला नाही, त्याला कारण अशोक सराफ यांच्यासारखे कलावंत आहेत. असं राज ठाकरे म्हणाले. आज जर अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेत असती तर मुख्यमंत्री झाली असती. त्यांच्या 40 – 40 फूट कटावेजवर दुग्धभिषेक झाला असता. पण आपल्या महाराष्ट्रात याच काही नाही. आपल्याकडे प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत असेही ते म्हणाले.

कलाकारांचे महत्त्व काय असत ते परदेशात गेल्यावर कळत. हाच कार्यक्रम जर युरोपात असता तर त्या देशाचे पंतप्रधान कार्यक्रमात हजर राहिले असते. राज ठाकरे म्हणाले. तर तर अशोक सराफ हे मूळ बेळगावचे आणि जन्म मुंबईचा आहे. खरंतर त्यांनी बेळगाव सीमावाद प्रश्न सोडवायला हवा असं राज ठाकरे म्हणताच सगळीकडे हशा पिकला.