धक्कादायक ! यवतमाळमध्ये बारावीत कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थीनीची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात बारावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. सेजल अनिल सालुरकर असे या आत्महत्या (Sucide) करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सेजलचा काल बारावीचा निकाल लागला. तिला बारावीला 65 टक्के गुण मिळाले. मात्र तिला आणखी मार्कांची अपेक्षा होती. यामुळे ती नैराश्येत गेली. याच नैराश्यातून तिने आत्महत्या (Sucide) केली. सेजलने अचानक उचललेल्या या पावलांमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सेजलच्या मृत्यूबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बारावीच्या परिक्षेत 65 टक्के गुण मिळाल्याच्या नैराश्येतून आत्महत्या
णी शहरातील लालगुडा परिसरात राहणारी सेजल सालुरकर हिला दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळाले होते. मात्र तिला बारावीच्या परीक्षेत 65 टक्के गुण मिळाले. कमी मार्क मिळाल्यामुळे सेजल नैराश्येत होती. याच नैराश्येतून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या तरुण मुलीच्या आत्महत्येच्या धक्क्याने सेजलच्या आईची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातही बारावीच्या परिक्षेत नापास झाल्याने तरुणाची आत्महत्या
काल पुण्यातील कोथरुड परिसरात देखील बारावीच्या परिक्षेत नापास झाल्याने एका तरुणाने राहत्या इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेत आत्महत्या (Sucide) केली. निखिल नाईक असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव होते. निखिल महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. त्याने राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

हे पण वाचा :
महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवारांनी केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…

पैगंबर वादाचे पडसाद; अल- कायदाची मुंबई- दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याची धमकी

खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला चिमुकला; जवानांनी वाचवला जीव

‘जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’ म्हणत कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड

Sarfaraz Khan ने रचला इतिहास, ब्रॅडमननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

Leave a Comment