Sunday, February 5, 2023

NDRFची टीम अडकली : चिपळूणला मदत कार्याला निघालेले 40 जण कोयनानगरजवळ अडकले

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली असल्याने वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागातील घरात व दुकानात पाणी साचले आहे. याठिकाणी एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणला मदतीसाठी निघालेली आहे. मात्र या टीमच्यापुढे विघ्नांची मालिका सुरू झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद, झाडे व दरडी कोसळलेल्या आहेत.

- Advertisement -

चिपळूण येथे आलेल्या महापूरात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सकाळी एनडीआरएफची टीम पुण्याहून निघालेली आहे. परंतु सध्या या टीमला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. चिपळूणकडे निघालेल्या टीमला सातारा जिल्ह्यातून जाताना पाटण तालुक्यातील अतिपावसाच्या क्षेत्रात अनेक अडचणी आलेल्या आहेत. कोयनानगर ते चिपळून हा मार्गावर आलेल्या पूराच्या पाण्यामुळे बंद आहे. त्यामुळे नवजा मार्गाने हे पथक निघालेले होते, परंतु या मार्गावरही कामरगाव येथे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक महाकाय झाड रस्त्यांमध्ये पडलेले आहे. त्यामुळे एनडीआरएएफचे पथक कामगरगाव येथे गेले 2 तास अडकून पडलेले आहे. काही वेळापूर्वी शासनाच्या जेसीबीने हे झाड काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एनडीआरएफची टीम अद्याप कोयनानगर जवळील कामरगाव येथे अडकली आहे. तेथून पुढे अजून चिपळून 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांना चिपळूण येथे पोहचण्यास वेळ लागणार आहे. चिपळून मार्गावर पावसाचा जोर अद्याप मोठा आहे, त्यामुळे वाहने चालविण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यांत पडलेले महाकाय झाड एनडीआरएफच्या टीमने स्वतः हटविले.

चिपळूणपर्यंत जेसीबी घेवून टीम जाणार : तहसिलदार

कामरगाव येथील झाड हटविल्यानंतर तेथून काही अतंरावर दरडी कोसळल्याची माहिती मिळाली असल्याने जेसीबी घेवूनच एनडीआरएएफच्या टीम प्रवास करणार आहे. या अडचणीत कोयना पावर हाऊसचे कर्मचारी मदतीसाठी धावून आलेले आहेत. तसेच पोलिस, तलाठी व सर्कल हे त्याठिकाणी मदतीसाठी आहेत. झाड हटविल्यानंतर पुढे दरडी कोसळल्या आहेत, त्या हटविण्यासाठी टीमला व कर्मचाऱ्यांना जेसीबी घेवूनच प्रवास करण्यास सांगितले असल्याचे पाटणचे तहसिलदार योगेश टोम्पे यांनी सांगितले.