हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ हे येत असतात. सध्या अशाच एक व्हिडीओ शोषलं मीडियावर व्हायरल झाला आहे. तो आहे मध्यप्रदेशमधील रतलाम येथील भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार प्रल्हाद पटेल यांचा. या व्हिडीओमध्ये ज्यांच्या घरांवर काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे, तो काढून टाकण्याचे पटेल सांगत आहेत. तसेच ज्यांच्या घरावर काँग्रेसचा झेंडा आहे, त्यांच्या सर्व सुविधा बंद करा, असे ते आपल्या सहकाऱ्यांना सांगताना दिसत आहे. पटेल यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावरून काँग्रेसचे नेत्यांकडून आता भाजपवर निशाणा साधला जाऊ लागला आहे.
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये रतलाम येथील भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार प्रल्हाद पटेल एका सभेत बोलताना दिसून येत आहेत. त्यामध्ये ते म्हणाले की, “ज्या घरांवर काँग्रेसचे झेंडे लावलेले आहेत, त्या सर्व घरांचे फोटो काढा आणि त्यांच्या सर्व सुविधा बंद करा. 10-5 मतं कमी मिळाली तरी काही फरक पडणार नाही. पण यांना अद्दल घडवा,” असे पटेल बोलताना दिसत आहेत.
यही भाजपा के लोकतंत्र का मॉडल है। https://t.co/jemTKFR8V4
— digvijaya singh (@digvijaya_28) July 10, 2022
प्रल्हाद पटेल यांचा व्हिडीओ व्हायरल होण्याची हि काही पहिली वेळ नाही. त्यांचा यापूर्वीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये ते सभेमध्येच गाणे गाताना दिसले होते. सभा सुरु असताना त्यांनी ‘तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा याराना’हे गाणं म्हटलं होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.