हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेतील कार्यक्रमात एका घडलेल्या घटनेमुळे प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही सध्या चर्चेत आली आहे. कारण त्या या ठिकाणी तिने जे नृत्य केले आहे, त्या नृत्यवेळी तिने तिरंग्याचा अपमान केला आहे. या तिच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डान्स परफॉर्मन्सनंतर नोरा फतेहीने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. पण यावेळी तिच्याकडून एक चूक झाली.
नोरा तिच्या दमदार डान्स परफॉर्मन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे सर्वत्र फेमस आहे. तिच्या लोकप्रियतेमुळे, तिला कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. नोराने या फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करताना आनंदाच्या भरात चुकीच्या पद्धतीने तिरंगा पकडला. तसेच त्यानंतर तिने तिरंगा स्वतःभोवती गुंडाळला आणि नंतर तिने तिरंगा परत केला. या घडलेल्या घटनेनंतर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
https://www.instagram.com/reel/CljduQ9h5lP/?utm_source=ig_web_copy_link
तिरंगा उलटा फडकावल्याने आता नोरा वादात सापडली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. व्हिडिओमध्ये नोरा म्हणताना ऐकू येते की, ‘भारत फिफा वर्ल्ड कपचा भाग नसला तरी आम्ही या महोत्सवाचा एक भाग आहोत. आमच्या संगीतातून, नृत्यातून. नोराच्या या शब्दांनी तिथे उपस्थित लोकांमध्ये उत्साह संचारला. त्यावेळी तिथले लोक इतके उत्तेजित होतात की ते हुल्लडबाजी करू लागतात. नोराने तिथे जय हिंदच्या घोषणा दिल्या, नोरासोबत उपस्थित लोकांनीही घोषणाबाजी सुरू केली. संपूर्ण स्टेडियम भारत, भारताच्या घोषणांनी दणाणू लागले.
नोराच्या या कृतीवर सोशल मीडियावर यूजर्स तिला खूप फटकारत आहेत. एका यूजरने लिहिले – तिरंगा चुकीचा पकडला गेला आहे. दुसऱ्याने लिहिले – तिरंगा अत्यंत चुकीच्या पद्धतीने देण्यात आला. हा तिरंग्याचा अपमान आहे.’ आणखी एका यूजरने लिहिले की, नोराला तिरंग्याचा आदर माहित नाही. नोराने तिरंग्याचा अपमान केला. युजर म्हणतो की त्याने तिरंगा फडकावला नसावा. हा तिरंग्याचा अनादर आहे.