हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या एका घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर शहर सुन्न झाले आहे. याठिकाणी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे एका महिलेला उसाचा फड पेटवून जिवंत जाळून टाकली आहे. या संपूर्ण घटनेप्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आशाताई मारुती खुळे या एक विधवा महिला होत्या. त्यांच्या पतीचे काही काळापूर्वीच निधन झाले होते. परंतु योगेश पांडुरंग पाटील याने सदर महिलेला जबरदस्ती करत शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात नेले. याठिकाणी त्याने बळजबरीने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु याला महिलेने नकार दिल्यामुळे रागात येऊन योगेशने तिचा गळा आवळून खून केला. पुढे ही घटना कोणालाही समजू नये त्यासाठी त्याने उसाच्या फडाला आग लावली.
गावकऱ्यांमध्ये उसाच्या फड्यातून येणारा धूर पाहून गोंधळ उडाला. त्यामुळे सर्व गावकरी आज विझवण्यासाठी उसाच्या फडामध्ये गेले. यावेळी आरोपी असलेला योगेश देखील आग विझवण्यासाठी पुढे आला. परंतु पुढे जाऊन संबंधित महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर याप्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, गावामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी योगेशच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी योगेशला अटक केली आहे. सध्या सर्व घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.




