हातात तिरंगा घेऊन तरुणाने 50 तासात धावत गाठली दिल्ली; लष्कर भरती सुरु करण्यासाठी मोदी सरकारकडे केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इच्छा तिथे मार्ग म्हणतात तेच खरं आहे. अशीच एक गोष्ट राजस्थान च्या एका तरुणाने करून दाखवली आहे. सैन्य भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या या तरुणाने तब्बल 50 तासांत 350 किलोमीटर चा प्रवास धावत करत थेट दिल्ली गाठलीय. दिल्लीतील जंतर मंतर येथे सैन्य भरती साठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभाग घेण्याकरता हा तरुण चक्क धावत जाऊन पोहोचलाय. या तरुणाचा धावत जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुरेश भीचर असे या युवकाचे नाव असून त्याने राजस्थान ते दिल्ली हे 350 किलोमीटर अंतर अवघ्या 50 तासांत धावत पार केल आहे. २९ मार्च रोजी हा तरुण राजस्थान येथून दिल्लीसाठी निघाला आणि प्रतितास 7 किलोमीटर अंतर पार करत सुरेशने रेकॉर्डच केले आहे. मला सैन्यात भरती होण्याची आवड असून भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तसेच तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आपण धावत दिल्लीत आल्याचं यावेळी सुरेश यांनी बोलताना सांगितलं. सुरेशने हा सर्व प्रवास हातात तिरंगा घेऊन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राजधानी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सध्या देशभरातील तरुण एकत्र जमले आहेत. मागील काही वर्षांपासून रखडलेली सैन्यभरती पुन्हा सुरु करावी या मागणीसाठी सैन्यभरतीची तयारी करत असलेल्या तरुणांनी जंतर मंतरवर आंदोलन सुरु केले आहे. यापार्श्वभूमीवर राजस्थानच्या सुरेशने राजस्थान ते दिल्ली अशी रनिंग करत आंदोलनात आपला सहभाग नोंदवला आहे. सुरेशसारखे शेकडो तरुण या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. यापूर्वीही अनेकदा तरुणांनी जंतरमंतर येथे आंदोलन करत कोविडमुळे सुमारे 2 वर्षांपासून रखडलेली सैन्य भरती मोहीम पुन्हा सुरू करावी अशी विनंती सरकारला केली आहे. मात्र यावेळी आंदोलक तरुणांनी जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोवर मागे हटवायचे नाही अशी भूमिका घेतल्याने याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

सुरेश यांना त्यांच्या प्रवासाबद्दल विचारले असता, मी रोज पहाटे 4 वाजता धावायला सुरुवात करायचो आणि 11 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर पोहोचल्यावरच थांबायचो. तिथे थोडी विश्रांती घेऊन जवळच्या भागातील सैन्यातील इच्छुकांकडून जेवण करायचो असं सांगितलज. तसेच सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांमध्ये उत्साह निर्माण व्हावा या हेतूसाठी आपण राजस्थान ते दिल्ली असा धावत प्रवास केल्याचाही सुरेश यांनी सांगितले.