साताऱ्यात भरदिवसा युवकावर कोयत्याने हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरात पुन्हा एकदा साताऱ्यात बकासुर गॅंग पुन्हा सक्रीय झाली आहे. शहरातील प्रतापगंज पेठेत एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. घटनास्थळी शाहूपुरी पोलिस दाखल झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील प्रतापगंज पेठेत भरदिवसा हा हल्ला झाला. लोकांची गर्दी असताना हा हल्ला झाल्याने परिसरात लोकांच्यात भीतीचे वातावरण होते. कोयत्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले आहे.

या घटनेमुळे प्रतापगंज पेठेत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी करण्यास सुरूवात केली आहे. घटनास्थळावरून या हल्ल्याची माहिती घेण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून सुरू केला आहे. या हल्ल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.  सदरचा हल्ला बकासुर गॅंगने केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.