सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
खटाव तालुक्यातील वडी या गावात एका युवकाचा खून झाल्याची घटना बुधवारी घडली. रात्रीच्या सुमारास घरगुती झालेल्या वादाचे भिषण मारामारीत रूपांतर झाले. त्यातून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून एकजण फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वडी, ता. खटाव येथे रात्रीच्या सुमारास नातेसंबंधात घरगुती झालेल्या वादाचे रूपांतर भिषण मारामारीत झाले. या मारामारीत विशाल आप्पासो येवले (२४)) आणि नात्याने मामा सासरे असणारे पोपट मोहन येवले (४५),मनोज मोहन येवले (३६), आणि या दोघांच्या पत्नी वैशाली मनोज येवले (३०), पोपट मोहन येवले (४५), वंदना पोपट येवले(४१) व मुलगा करण पोपट येवले (१९) यांच्या मध्ये जोरदार भांडण झाले. या झालेल्या भांडणात विशाल याच्या शरीरावर वार झाल्याने त्यास उशीरा कराड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. तर या प्रकरणी संशयित चौघांना औंध पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर करण पोपट येवले (१९) फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेनंतर वडी परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी औंध सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत बधे, पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सर्व सहकारी पोलिस कर्मचारी, तालुका पोलिस सह सातारा श्वानपथक आणि गुन्हे अन्वेषणचे पथक दाखल झाले आहे.