हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल आधार नंबर (aadhar card) खूप महत्वाचा बनला आहे. तो ओळखीचा पुरावा आणि रहिवाशाचा पुरावा म्हणुनही वापरता येतो. सरकारच्या अनेक योजनांचा फायदा घेण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. तसेच पासपोर्ट, पॅन कार्ड आणि रेशनकार्ड यांसारखी सरकारी अधिकृत कागदपत्रे मिळविण्यासाठीही आधार नंबर गरजेचा आहे.
आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था UIDAI ने आधार नंबर खरा आहे की बनावट हे ओळ्खण्याचे दोन सोपे मार्ग सांगितले आहेत. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तपासता येईल.
ऑनलाइन चॅनेलद्वारे आधार नंबर व्हेरिफाय करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा
आधार धारकाचा आधार नंबर टाका.
कॅप्चा कोड एंटर करा आणि ‘आधार व्हेरिफाय करा’ बटणावर क्लिक करा.
याद्वारे आपल्याला कळेल की आधार नंबर आहे की नाही. याशिवाय, याच्या मदतीने तुम्हाला वय, लिंग, राज्य आणि आधार धारकाच्या मोबाईलचे शेवटचे 3 अंक यांसारखे डिटेल्स देखील कळतील. (aadhar card)
ऑफलाइन चॅनेलद्वारे आधार क्रमांक व्हेरिफाय करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा
तुमच्या Android स्मार्टफोनवर Google Play किंवा Apple च्या App Store द्वारे iPhone द्वारे आधार QR स्कॅनर App डाउनलोड करा आणि App मध्ये लॉग इन करा.
कार्डधारकाच्या आधार कार्डावरील (aadhar card) QR कोड स्कॅन करा. याद्वारे आपल्याला कळेल की नंबर खरा आहे की नाही.
हे ही वाचा तुमच्या आधारचा कुठे गैरवापर होत आहे का? Aadhar Authentication History कशी तपासावी जाणून घ्या
हे ही वाचा आधारशी आपले जन धन खाते लिंक करण्यासाठी काय करावे ते समजून घ्या