हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : आता आधारशी संबंधित कामांसाठी लोकांना आधार केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. कारण आता या संबंधित सर्व सेवा या पोस्टमनच्या माध्यमातून लोकांना घरपोच देण्याचा निर्णय सरकारने घेण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, सध्या लोकांना नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी आणि आधार कार्ड मधील माहिती अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागते.
UIDAI कडून सध्या आधारशी संबंधित सर्व्हिस देण्यासाठी पोस्टमनला प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात अशा 48,000 पोस्टमनना ट्रेनिंग देण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात 150,000 पोस्ट अधिकाऱ्यांना घेतले जाईल. Aadhar Card
पोस्टमन घरपोच सेवा मिळणार
आता आधारशी संबंधित जवळपास सर्वच सुविधा पोस्टमन कडून दिल्या जातील. यामध्ये नवीन आधार काढणे, मुलांसाठी आधार तयार करणे, आधार मोबाईल नंबरशी लिंक करणे आणि इतर माहिती अपडेट करणे यांचा समावेश असेल. मात्र, घरपोच आधार सेवा मिळवण्यासाठी लोकांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल की फोनद्वारे पोस्टमनशी संपर्क साधावा लागेल, याबाबत सरकारकडून अद्याप काही सांगितले गेलेले नाही. Aadhar Card
लॅपटॉप आणि स्कॅनर देखील मिळेल
आधारशी संबंधित काम करण्यासाठी आता पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप आणि बायोमेट्रिक स्कॅनर यांसारखी उपकरणेही दिली जातील. याद्वारे ते लोकांच्या आधार डेटाबेसमध्ये एक्सेस मिळवू शकतील. यां व्यतिरिक्त, UAIDI कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणार्या 13,000 बँकिंग करस्पॉन्डंटनाही सहभागी करून घेण्याबाबत विचार करत आहे. Aadhar Card
हे लक्षात घ्या कि, देशभरात जवळपास 755 जिल्ह्यांमध्ये आधार केंद्रे कार्यरत आहेत. UAIDI कडून आधार अपडेट करण्यासाठी ऑनलाइन सुविधा देखील दिली जाते. यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट देखील घेता येते. या केंद्रांवर नावनोंदणी करण्यापासून ते आधार बनवण्यापर्यंत तसेच आधारमध्ये तपशील अपडेट करण्याची सुविधा देखील मिळते. यामध्ये नावात सुधारणा, जन्मतारीखेत बदल करणे, मोबाईल/ईमेल आयडी बदलणे, एड्रेस अपडेट करणे, फोटो बदलणे आणि बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट करणे यांसारख्या कामांचा समवेश आहे. Aadhar Card
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतील हे जाणून घ्या
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात दिला अडीच पट नफा !!!
rave party काय असते ??? मोठ्या घरातील तरुणांमध्ये त्याची क्रेझ का वाढते आहे ???
Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा