‘त्या’ मुलांना पक्षाचा झेंडा घेऊन भर उन्हात उभं केल्याने आदित्य ठाकरे भाजपवर संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत भाजपने राज्यभरात आंदोलन सुरु केलं आहे. यावर महाविकासआघाडीचे नेते भाजपवर टीका करत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत भाजपवर टीका केली आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलं कि, “हे अगदीच लज्जास्पद आहे. सत्तेच्या लालसेपोटी नेते काय करू शकतात. लहान मुलांना तळपत्या उन्हात उभं करण्यात केलं आहे. त्यांच्या तोंडावरील मास्क पूर्णपणे खाली सरकले आहेत. आज या मुलांना सुरक्षित आणि घरातच ठेवण्याची गरज असताना राजकीय आंदोलन करताना त्यांचे चेहरेही व्यवस्थित झाकलेले नाहीत. करोनाला विसरून गेले. कारण राजकारण प्रिय आहे,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. महाविकासआघाडी सत्तेत आल्यानंतर कोरोनाचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलं. त्यापासून आता राज्याला बाहेर काढण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. राज्यात वाढत जाणारे कोरोना रुग्ण आणि मृत्यू यामुळे भाजप आंदोलन करून सरकारला घेरण्याचा प्रयन्त करत आहे. सरकारवर अपयशी ठरत असल्याची वांरवांर टीका होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेटाळून लावत संपूर्ण राज्य कोरोनाचा मुकाबला करत आहे. आपापल्या परीनं जमेल तसं योगदान राज्यातील प्रत्येक नागरिक देत आहे. अशावेळी भाजप आंदोलन करून कोरोनाच्या लढाईत दिवसरात्र काम करणाऱ्या योध्यांचा अपमान करत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्याचं म्हणणं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment