हरभजन सिंगला ‘आप’ राज्यसभेवर पाठवणार?? मिळू शकते ‘ही’ मोठी जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंजाबमध्ये आम आदमी पार्टी (आप) सत्तेवर आली असून भगवंत मान राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. पंजाबमधून द्वैवार्षिक निवडणुकीत ‘आप’ माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला राज्यसभेवर पाठवू शकते, अशी माहिती आता मिळाली आहे. एवढंच नव्हे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नवनिर्वाचित आप सरकार क्रीडा विद्यापीठाची कमानही हरभजन सिंगकडे सोपवू शकते. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जालंधरमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.

यापूर्वी, आम आदमी पक्षाच्या विजयानंतर लगेचच माजी भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग उर्फ ​​भज्जीने भगवंत मान यांचे अभिनंदन केले होते. “आम आदमी पक्षाचे आणि माझे मित्र भगवंत मान आमचे नवीन मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन.. भगतसिंग यांच्या खटकरकलन गावात नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे ऐकून खूप आनंद झाला… काय चित्र आहे… माताजींसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. असे ट्विट हरभजन सिंगने केलं

विशेष म्हणजे पंजाबमधील आम आदमी पक्षाचा हा पहिलाच विजय आहे. येथे ऐतिहासिक विजय मिळवत ‘आप’ने 117 विधानसभा मतदारसंघांपैकी 92 जागा जिंकल्या आहेत. आता पंजाबमधील राज्यसभेच्या पाच जागा पुढील महिन्यात रिक्त होणार आहेत. निवडणूक आयोगाने द्वैवार्षिक निवडणुकांच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. असे मानले जात आहे की आम आदमी पार्टी लवकरच जागांसाठी नावांची घोषणा करू शकते.