आता घर बसल्या तपासा कोरोना ; सरकारकडून ‘आरोग्य सेतु’ अँप लॉन्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून ‘आरोग्य सेतू’ नावाचं अँप लॉन्च केलं आहे. कोरोना व्हायरसची जोखीम कितपत आहे याबाबत आकलन करणारं हे अँप नॅशनल इंफोमेटिक्स सेंटरकडून लॉन्च केलं आहे. या अँपमुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असं नॅशनल इंफर्मेटिक्स सेंटरच्या अधिकारी नीता वर्मा यांनी सांगितलं. हे अँप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड केलं जाऊ शकतं.

हे अँप तुम्हाला कोरोनापासून वाचण्यासाठी मदत करणार आहे. कोरोनाबधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचं काम या अपद्वारे केलं जाणार आहे. हे अँप युझरच्या फोनचे ब्लुटूथ, लोकेशन आणि मोबाईल नंबरचा उपयोग करून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात तर आला नाही ना? या गोष्टी ट्रेस करतं.

कोरोना व्हायरस विरोधातील या लढाईत जगभरात वेगवेगळे शोध लावले जात आहेत. देशात देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाविरोधात पूर्णपणे उतरले आहेत. COVID-19 ला ट्रॅक करण्यासाठी वेगवेगळे अॅप विकसित केले जात आहेत. नुकतेच केंद्र सरकारने कोरोना कवच नावाचं अॅप लॉन्च केलं होतं. आता आरोग्य सेतू नावाचं अप सरकारने लॉन्च केलं आहे. हे अँप कोरोना ट्रेकर अँप आहे. या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्याला कोरोना आहे की नाही हे तपासू शकता. आरोग्य सेतु अपमध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली गेलीय. तसेच दुसरं म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते.जर तुमच्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणं असतील तर हे अप तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देतं.

गुगल प्ले स्टोरवरून असं करा अँप इन्स्टॉल

१)आरोग्य सेतू अँप वापरण्यासाठी आपला फोन नंबर रजिस्टर करा.
२)फोन नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. जो इंटर केल्यावर अपमध्ये रजिस्ट्रेशन होईल.
३)हे एक कोरोना व्हायरस ट्रॅकिंग अँप आहे.
४)इंटर झाल्यानंतर अँप आपल्याला ब्लूटूथ आणि जीपीएस ऍक्सेस विचारते.
५)आपल्या डिव्हाईसमधून युझरचा डेटा अनक्रिप्टेड फॉर्ममध्ये घेतला जातो.
६)अँप उघडल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारली जातात. यामध्ये जेंडर, नाव, वय, व्यवसाय आणि मागील 30 दिवसांच्या ट्रॅव्हल हिष्ट्रीबाबत विचारलं जातं. अर्थात या माहितीला आपण स्कीप देखील करू शकतो.
७)यानंतर अॅपची भाषा निवडावी लागते.
८)अपमध्ये सर्व राज्यांमधील हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.
९)आपल्याला वाटल्यास आपण या संकटकाळात स्वतःला स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करू शकता.
१०)या अॅपमध्ये इस युझर आपले सेल्फ असेसमेंट करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता

Leave a Comment