टीम, HELLO महाराष्ट्र – ग्रामीण भागात कायदा व सुव्यस्था अबाधीत रहावी यासाठी पोलीस पाटील म्हणून एखाद्याची नेमणूक करण्यात येते. पण ज्याची नेमणूक करण्यात येते त्यानेच आदिवासी महिलांची छेड काढल्याची खळबळजनक घटना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात घडली आहे.
झाई बोरिगाव ग्रामपंचायती अंतर्गत असणाऱ्या मोरेपाडा गावच्या पोलीस पाटलाकडूनच पाड्यातील महिलांची छेड काढण्यात येत होती. हा पोलीस पाटील गावातील महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न करत असल्याचा आरोप या आदिवासी महिलांनी केला आहे.
पोलीस पाटलाच्या या कृत्याला आदिवासी महिला कंटाळल्याने त्यांनी अखेर या पोलीस पाटलाला चांगलाच चोप दिला. तसेच त्याला अर्धनग्न करत त्याची धिंडही काढलीये. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.