औरंगाबाद : साहेब जरा बाजूला थांबा असे म्हणतात राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अमलदारावर भडकले त्या नंतर बराचवेळ हा सर्व गोंधळ सुरू होता ही घटना आज सकाळी क्रांतिचौक जवळील मतदान केंद्रावर घडली.
आज सकाळी 8 वाजेपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 18 जागा साठी मतदानाला सुरुवात झाली आहे.क्रांतिचौक जवळील विभागीय सह निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात मतदानाचा केंद्र असून आज सकाळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार तेथे आले. पदाधिकारी व इतर उमेद्वारासह ते केंद्राजवळ चर्चा करीत थांबले असता त्यावेळी तेथे बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस नाईक भोकरे यांनी राज्यमंत्री सत्तार यांना आपण थोडं बाजूला जाऊन थांबा वरिष्ठ आम्हाला बोलतील असे सांगत बाजूला जाण्याची विनंती केली. भोकरेंचे हे शब्द एकताच सत्तार बंदोबस्तावरील पोलिसांवर भडकले सत्तार यांच्या पहाडी आवाजाने परिसरात बराच गोंधळ उडाला बाजूलाच असलेले पोलीस धावत तेथे आले. तर राष्ट्रवादीचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मध्यस्थी केली. तर एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सत्तार यांची समजूत काढली व प्रकरण शांत झाले.
काही वेळाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता ,पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, साह्ययक आयुक्त हनुमंत भापकर सह काही अनुचित प्रकार घडून गालबोट लागू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिग्रकृती दलासह विविध विभागातील पथके घटनस्थळी दाखल झाल्या होत्या.सत्तार हे केंद्रावरून जाताच इगो हार्ट झाल्याच्या खमंग चर्चेला उधाण आले होते.