काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांचा हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळतीचे ग्रहण लागलेले असतानाच आता अब्दुल सत्तार यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील काही दिवसापासून अब्दुल सत्ता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येत असतानाच सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला नक्कीच धक्का बसला असणार हे मात्र निश्चित.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकी आधीच आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी आपल्या उमेदवारी करण्यामुळे चुकीचा व्यक्ती निवडणुकीला विजयी होऊ नये म्हणून निवडणुकीतून माघार देखील घेतली होती. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धोरणे रुचत नाहीत असे म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.

शिवसेना पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची बाजू घेऊन सत्तेत असताना देखील झगडा मांडला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना नेहमी आग्रही असते म्हणूनच आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे शिवसेना प्रवेशावेळी अब्दुल सत्तार यांनी म्हणले आहे.