औरंगाबाद प्रतिनिधी । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना शिवसेनेत आणायला हवंय. आम्ही त्यांना शिवसेनेतून राज्यसभेवर पाठवू. त्यांच्यासारख्या विद्वान माणसाची राज्यसभेत गरज आहे. अशा शब्दांत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी जलील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी सत्तार यांनी असे विधान केले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व मंदिरे खुली करावीत अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. यावर जलील हे एमआयएम मध्ये आहेत आणि त्यांना एमआयएम म्हणजे काय हे तरी माहिती आहे का असे म्हणत जलील यांनी शिवसेनेत यायला हवं असं विधान केलं. जलील यांनी एनडीटीव्ही, लोकमत मध्ये काम केले आहे. ते हुशार आहेत. त्यांना कोणत्यातरी पत्रकार मित्राने सांगितलं कि सरकार आता मंदिर उघडण्याच्या विचारात आहे. त्यानंतर जलील यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले. जलील यांना शिवसेनेत आणायला हवंय. खैरे साहेब आमचे नेते आहेत. येणाऱ्या निवडणुकीला आम्ही खैरेंना लोकसभेत पाठवू आणि जलील यांना राज्यसभेत पाठवू असहि सत्तार म्हणाले. असे सत्तर पुढे म्हणाले.
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी अब्दुल सत्तार यांना प्रत्युत्तर देताना तुम्ही कित्तेक वर्ष शिवसेनेला शिव्या देत होता. जातीवाचक पक्ष म्हणून तुम्ही शिवसेनेला हिणवत होता. मात्र सत्तेसाठी तुम्हीही शिवसेनेत प्रवेश केला. ज्या मंदिरांच्या मुद्यांवर निवडणूक लढवून तुम्ही सत्तेत आला ती मंदिरे उघडण्यासाठी तुमच्या सरकारने काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच आपल्याला मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करावे लागले अशी माहिती जलील यांनी दिली.