हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ने राज्यातील महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्यात चर्चाना उधाण आले असतानाच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या यांच्या नव्या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. मला खासदार करण्यात शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा होता असे जलील यांनी म्हंटल आहे. वैजापूरच्या खंडाळा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जलील म्हणाले, अब्दुल सत्तार हे औरंगाबादचे किंगमेकर झाले आहेत. राजकारणात एखाद्यावर त्यांची कृपादृष्टी झाल्यास त्याचे नशीब बदलून जाते. मात्र एखाद्यावर सत्तार नाराज झाल्यास त्याचा वाईट काळ सुरू होते, मला लोकसभा निवडणुकीत त्यांनी खूप मोठी मदत केली. त्यामुळे मी खासदार होण्यात सत्तार यांचा सिंहाचा वाटा आहे असे त्यांनी म्हंटल.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वीच इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत राज्यातील महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली होती. आघाडीतील तिन्ही पक्षांनी एमआयएम ची ऑफर धुडकावून लावल्यानंतरही राज्यात या प्रस्तावामुळे राजकीय खळबळ उडाली होती. त्यातच आता जलील यांनी सत्तारांबद्दल केलेल्या या दाव्यानंतर शिवसेनेचे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे नेमकं काय उत्तर देणार हे पाहायला हवे.