हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. यांनतर सत्तार यांनी माझे शब्द मागे घेतो असं म्हंटल खरं, पण यामध्ये कुठेही त्यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं नाही. उलट मी जे बोललो ती आमची ग्रामीण भाषा आहे अस अजब उत्तर सत्तार यांनी दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, माझ्या बोलण्याने कोणत्याही महिलेच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबाबत खेद व्यक्त करतो . पण कोणी आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आमच्यावर खोक्याचा आरोप करत असेल तरत्यांच्याबद्दल मी जे बोललो ती आमची ग्रामीण भाषा आहे. पण महिलांबद्दल मी एक शब्दही बोललो नाही. महिलांचा आदर करणार मी कार्यकर्ता आहे. कोणाच्या भावना दुखावणारे विधान मी केलेलं नाही. मी महिलांना काहीही बोललो नाही, पण जे आम्हाला खोक्यावरून बोलताना त्यांच्यासाठी ते उत्तर होत. . तरीही बाकीच्या महिलांचे मन दुखावलं असेल तर मी सॉरी म्हणतो असं सत्तार म्हणाले.
सत्तारांची 1 चूक अन् राष्ट्रवादीने रान उठवलं; शिंदे गटानेही हात झटकले
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/QpYEkVFoBp#hellomaharashtra @NCPspeaks @supriya_sule
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 7, 2022
नेमकं काय आहे प्रकरण –
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तार यांच्यावर ५० खोक्या वरून टीका केली होती. त्याबाबत आज एका वृत्तवाहिनीने सत्तार यांना विचारलं असता त्यावर उत्तर देताना सत्तारांची जीभ घसरली. . इतकी भिकार– झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ अशी शिवीगाळ त्यांनी केली. सत्तार यांच्या विधानाचे जोरदार पडसाद राज्यभर उमटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द २४ तासांत मागे घ्यावे अन्यथा त्यांची जीभ हासडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.