आज बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता…

Balasaheb Thackeray Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका देत आपल्या आमदारांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांसह काही राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया दिल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून “आज जी परिस्थिती आहे यावेळी जर बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता.”, असे म्हंटले आहे.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आज देहू येथे येत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बिचुकले म्हणाले की, “आज महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर सांगायचे झाले तर आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानाखाली वाचवून जाळ काढला असता.

मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या या प्रकारानंतरही काहीही होणार नाही. उद्धव ठाकरे संकटातून बाहेर पडतील आणि मुख्यमंत्री तेच राहतील. असे म्हणत बिचुकले यांनी मी जेव्हा वरळीतून निवडणुकीसाठी उभा होतो तेव्हाचा माझा अभिमान आत्ताच्या राजकारण्यांकडून कॉपी केली जात आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.