इंजिनियर पठ्ठ्या वेलची केळीतून कमवतोय 28 लाख उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा घरची शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करत आहेत. असाच प्रयोग वाशिंबे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी अभिजित पाटील याने केला असून त्याने वेलची आणि रेड बनाना या केळीच्या दक्षिण भारतातील व वेगळ्या वाणांची लागवड केली आहे. दोन्ही वाणांचे सुमारे 7 एकर क्षेत्रात लागवड करून आज वर्षाकाठी तब्बल 28 लाखांचे उत्पन्न तो कमवत आहे.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या ‘बॅकवॅाटर’चा भाग असलेले वाशिंबे हे सोलापूर जिल्ह्याच्या टोकाचे करमाळ्यापासून 30 किलोमीटरवरील गाव आहे. वाशिंबे येथील राजाभाऊ पाटील यांचे चिरंजीव अभिजित यांनी 2015 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतातून अभिजीतने घेतलेल्या वेलची केळीसह इतर पिके घेता येऊ शकतील. तसेच त्याच्या प्रमाणे चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा त्यातून तुम्हाला नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती मिळेल आणि त्यातून तुम्हीही स्वतः अनेक पिकाची माहिती घेत उत्तम शेती करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

अभिजीतच्या घरच्या एकूण 30 एकर शेतीत वडिलांकडून सुरुवातीला केळीचे उत्पादन घेतले जात होते. पण अभिजित यांनी त्यात बदल करण्याचा निर्णय घेतला. सात-आठ वर्षांपूर्वी केळीच्या विपणना निमित्ताने तो तमिळनाडूमध्ये गेला असताना तिकडच्या रेड बनाना, वेलची आदी केळी वाणांची माहिती मिळाली. त्याची लागवड, बाजारपेठ यांचा अभ्यास केला.

banana cover

असे आहेत फायदे

ही केळी खाण्यासाठी गोड असून त्यांच्यात औषधी गुणधर्म आहेत. रोग प्रतिकारशक्ती आणि चयापचय शक्ती वाढण्यास ही केळी उपयुक्त आहेत. ‘क’ जीवनसत्त्व, अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण चांगले आहे. विविध आजारांवर ती फायदेशीर असून, त्यास चांगली मागणी आहेत. त्यामुळे त्यास नेहमीच्या केळीपेक्षा अधिक दर मिळतो अशा काही बाबी समजल्या. धाडस व जोखीम घेऊन या वाणांची लागवड करण्याचे निश्‍चित केले.

Manzano Banana

नव्या वाणांचे प्रयोग

अभिजीतने पुणे भागातील एका कंपनीकडून वेलची व रेड बनाना वाणांची रोपे आणली. यावेळी स्वतःच्या जबाबदारीवर त्यांचा प्रयोग करावा असे कंपनीकडून सांगण्यात आले. त्या अनुषंगाने ‘बॉण्ड’वर लिहूनही घेण्यात आले. आज वेलची वाणाच्या लागवडीला सात वर्षे, तर ‘रेड बनाना’ वाणाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन्ही वाण चांगला ‘परफॉर्मन्स’ दाखवत आहे. वेलची वाण 16 एकरांवर, तर रेड बनाना वाण चार एकरांवर आहे. दोन्ही केळी खाण्यास अत्यंत गोड आहेत.

केळी

अशा प्रकारे केली लागवड

1) टिश्यू कल्चर रोपांची लागवडकरताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यावा लगतात.

2) वेलची सात पाच बाय व सहा बाय पाच तर रेड बनानाची सहा बाय सहा फूट अंतरावर लागवड केली जाते.

3) लागवडी आधी तीन ट्रॅाली शेणखत आणि मळी वापरली. रोटर वापरून खत मिसळून घ्यावे.

4) लागवडीनंतर पहिल्या महिन्यापर्यंत दर चार दिवसांनी १९ः१९ः१९ एकरी सहा किलो, १३ः०ः४५ आणि युरिया प्रत्येकी तीन किलो देण्यात येते.

5) दुसऱ्या महिन्यापासून चौथ्या महिन्यापर्यंत दर चार दिवसांनी १९ः१९ः१९ एकरी दहा किलो, युरिया आणि पोटॅश प्रत्येकी तीन किलो व महिन्यातून दोन वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्यात येतात.

6) चौथ्या महिन्यापासून सहा महिन्यांपर्यंत दर चार दिवसांनी अमोनिअम सल्फेट एकरी सहा किलो, १३ः०ः४५ तीन किलो, पोटॅश आठ किलो आणि कॅल्शिअम नायट्रेट १२ किलो.

7) साडेतीन ते चौथ्या महिन्यात प्रति झाड दोन पाट्या शेणखत देण्यात येते.

8) वेलची केळी साधारण अकराव्या महिन्यात तर रेड बनाना १५ व्या महिन्यात काढणीस येते.

केळी 02

इतका आला खर्च

अभिजीतला वेलची केळी लागवडीसाठी एकरी ७० हजार रुपये पहिल्या वर्षी आला. वाणांच्या रोपांची किंमत प्रति नग २५ रुपये आहे. खोडव्याला हा खर्च अजून कमी म्हणजे २५ ते ३० हजारांपर्यंतच आला. २०२० मध्ये वेलची केळीला प्रति किलो किमान ३० रुपये, सर्वाधिक ५८ रुपये दर मिळाला. २०२१ मध्ये रेड बनानाला किमान ३० रुपये, सर्वाधिक ५५ रुपये, तर वेलचीला किमान ४५ रुपये, सर्वाधिक ६० रुपये तर वेलचीला किमान ५५ रुपये आणि सर्वाधिक ७५ रुपये दर मिळाला.

bnnana

सोलापूर हे वेलची केळी लागवडीचे केंद्र बनतय

सध्या सोलापूरच्या वाशिंबे परिसरात 500 एकरांवर अनेक शेतकरी वेलची केळीची लागवड करत आहेत. पूर्वी केळीच्या या जातीची लागवड फक्त तामिळनाडू आणि कर्नाटकात होत होती. मात्र, आता त्याची लागवड सोलापूर, महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या केळीची विक्रीही वाढत आहे.